राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाताळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम हा एकमेव कार्यक्रम राबविण्यात येत असून पाणी पुरवठा या मूलभूत बाबीसाठी राज्यास पूर्णपणे केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागत होते. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमामधून तूर्त बंद केलेले निधी वितरण व राज्याचे केंद्र शासनावर  असलेले अवलंबित्व या बाबींचा विचार करता ग्रामीण भागात पिण्याच्या पुरेश्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाचा स्वतःचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असणे अत्यंत आवश्यक झाले होते. या परिस्थितीचा विचार करून मंत्रीमंडळाच्या दिनांक ६ एप्रिल, २०१६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार शासनाने राज्यातील ग्रामीण भागांतील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता “मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम (Mukhyamantri Rural Drinking Water Programme-MRDWP)” या नावाखाली एक सर्वसमावेशक कार्यक्रम राबविण्यास मान्यता दिली. सदर योजना २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांसाठी राबविण्यात येईल.

उद्दिष्टे
  • राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे
  • राज्यातील ग्रामीण भागात (गावे/वाड्या/वस्त्या) पाणी पुरवठा योजना राबविणे
व्याप्ती
  • राज्यातील सर्व ग्रामीण भागास लागू
  • नव्याने निर्माण होत असलेल्या अथवा निर्माण झालेल्या नगरपंचायती/नगरपालिका/नागरी क्षेत्रासाठी लागू नाही.
वर्गीकरण
  1. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत हाती घ्यावयाच्या नवीन योजना
  2. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन
  3. प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती
महत्वपूर्ण शासननिर्णय
दिनांक विषय
०७/०५/२०१६ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यभरात राबविण्याबाबत
१९/०१/२०१७ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांना वितरीत करावयाच्या देखभाल-दुरुस्ती प्रोत्साहन अनुदानाबाबत मार्गदर्शक सूचना
२१/०३/२०१७ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत परिशिष्ट क मधील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना देखभाल दुरुस्ती प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्याबाबत
२१/०३/२०१७ पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था स्तरावर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे संनियंत्रण, पर्यवेक्षण व समन्वयन करण्यासाठी उपलब्ध अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून कामे पार पाडण्याबाबत.
२१/०३/२०१७ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सहाय्यकृत बाबी या घटकाकरिता पाणी व स्वच्छ्ता सहाय्य संस्थेस अनुदान वितरीत करणेबाबत.
२५/०१/२०१७ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या (MRDWP) अंमलबजावणीबाबत.
१५/०६/२०१५ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या त्रयस्थ तांत्रिक परीक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना
१८/०५/२०१७ मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या नळ पाणी पुरवठा योजनांच्या त्रयस्थ तांत्रिक परीक्षणाबाबत..

Image result for animated gif new

नवीन पाणी पुरवठा योजनांच्या भौतिक आणि आर्थिक प्रगती विषयक माहिती भरण्यासाठी (Excel Format) येथे क्लिक करा

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना - ऑन लाईन डाटा एन्ट्री (सॉफ्टवेअर)

सदर प्रणालीचा वापर करण्यासाठी म.जी.प्रा. / जिल्हा परिषद येथील संबंधित अधिकाऱ्यांना User Name व Password लवकरच ई-मेल द्वारे कळविण्यात येतील.

 अंतर्गत विविध योजनांची प्रगती/सद्यस्थिती

१. नवीन पाणी पुरवठा योजना (परिशिष्ट-अ)       |     गोषवारा
२. पुनरुज्जीवित करण्यायोग्य प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (परिशिष्ट-ब)
३. देखभाल व दुरुस्ती करावयाच्या प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना (परिशिष्ट-क)

© Water and Sanitation Department, Govt. of Maharashtra           |                 Designed and Developed by : Kascom